भुसावळ मुख्याधिकारीपदी संदीप चिद्रवार

0

भुसावळ : भुसावळ पालिकेला अखेर पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले असून महादूला नगरपंचायतीचे परीविक्षाधीन मुख्याधिकारी संदीप चिद्रवार हे भुसावळ पालिकेत बदलून येत आहेत. त्यांंच्या बदलीचे आदेश बुधवारी प्राप्त झाले आहेत. कोरोना काळात समाधानकारक काम न केल्याने 1 जूनला सक्तीच्या रजेवर पाठविलेल्या करुणा डहाळे यांच्या बदलीनंतर तब्बल सव्वादोन महिन्यांनी भुसावळला कायम मुख्याधिकारी मिळाले आहेत. दरम्यान, डहाळे यांना रजेवर पाठवल्यानंतर 7 जुलै रोजी मुख्याधिकारी म्हणून कामठी, जि. नागपूर येथून रमाकांत डाके यांची बदली झाली मात्र पदभारानंतरही ते रूजू झाले नव्हते. त्यामुळे चोपडा येथील मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्याकडे पदभार होता.