भुसावळ मुख्याधिकार्‍यांविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर ; राहुल सोनटक्केंविरुद्ध गुन्हा

0

फेसबुकवरील मजकुरानंतर शिव्या दिल्याने जिल्हा पेठ पोलिसात तक्रार

भुसावळ- सामाजिक कार्यकर्ते डॉ.नि.तु.पाटील यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टवर शहरातील राहुल सोनटक्के यांनी आक्षेपार्ह कॉमेंट करून मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांना अश्‍लील भाषेत शिवीगाळ केल्याने या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे नेमके प्रकरण ?
डॉ.पाटील यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर जळगाव रोडवरील वासुदेव ज्येष्ठ नागरीक संघाने ग्रीनस्पेस विकासासाठ स्पेस नंबर 221/4/2 या जागेची मागणी केली होती मात्र पाच महिने उलटूनही पालिकेने दखल घेतली नसल्याने पुन्हा स्मरणपत्र पाठवल्यासंदर्भात एका वृत्तपत्रातील कात्रणाची पोस्ट टाकली होती. या पोस्टवर शहरातील राहुल सोनटक्के यांनी आक्षेपार्ह भाषेत मुख्याधिकार्‍यांना शिवीगाळ केल्याने बी.टी.बाविस्कर यांनी मंगळवारी जिल्हा पेठ पोलिसात ठाण्यात तक्रार दिल्यानंतर भादंवि 500, 501 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.