भुसावळ येथे गणेशमूर्ती कार्यशाळा उत्साहात

0

भुसावळ- सार्वजनिक वाचनालय व अखिल भारतीय बहुभाषिक नाट्य परीषदेच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 5 ऑगस्ट रोजी शहरातील शामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळील वाचनालयाच्या वाचन कक्षात गणेशमूर्ती बनवण्यासंदर्भात कार्यशाळा झाली. 10 वर्षावरील विद्यार्थ्यांसह नागरीक मिळून 22 जणांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. गणेशोत्सवात पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी श्री मूर्ती शाडू मूर्तीच्या असल्यास त्यांचे तापी पात्रात पूर्णपणे विसर्जन होते. हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून गेल्या वर्षांपासून ज्येष्ठ रंगकर्मी व मूर्तिकार रमाकांत भालेराव मार्गदर्शन करतात. प्रसंगी यात सहभाग घेणार्‍यांना साहित्य पुरविण्यात आले. यशस्वीतेसाठी चारू भालेराव, शंभू गोडबोले, शुभम कुळकर्णी, विक्की चव्हाण, उदय जोशी, कौस्तुभ देवधर, संजय यावलकर आणि सार्वजनिक वाचनालयाचे अवधूत दामोदरे आदींनी परीश्रम घेतले.