भुसावळ । दरवर्षीप्रमाणे मरीमाता यात्रा उत्सवानिमित्त 29 मार्च बुधवारी आयोजित करण्यात आले आहे. दुपारी 3 वा. पासून ते रात्री 8 वाजेपर्यंत राहणार आहे. दरवर्षी या कुस्त्यांसाठी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील अनेक राज्यातून नवयुवक पहेलवान व ज्येष्ठ पहेलवान सहभागी होत असतात. मरीमाता यात्रेनिमित्त सदरची कुस्त्यांची दंगल जवळपास 60-65 वर्षांपासून नियमित सुरु असून यावर्षी सुद्धा कुस्त्यांसाठी राज्यातील विविध भागातून व मध्यप्रदेश व अन्य राज्यातून अनेक पहेलवान उपस्थित राहणार असून शहरातील सर्व नागरिकांनी व नवयुवकांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन जुना सातारा व्यायाम शाळेतर्फे करण्यात येत आहे.