भुसावळ येथे सीआरएमएसतर्फे धरणे आंदोलन

0

भुसावळ। सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात भुसावळ रेल्वे प्रबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात संघटनेतर्फे रेल्वे प्रबंधकांना निवेदन देण्यात आले आहे. यातील मागण्यांमध्ये खाजगी आणि अखाजगी स्टाफचे ग्रेड पे 4 हजार 600 करावे, रिक्त जागा भरण्यात याव्या या मागण्या आहे.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी मंडळ अध्यक्ष व्ही.के. समाधिया, मंडळ सचिव एस.बी. पाटील, कोषाध्यक्ष तोरणसिंह, शाखा सचिव एस.एस. चौधरी, आर.डी. घोष, सतिश पाटील, खंंडवा शाखा सचिव बी.के. चतुर्वेदी, अकोला शाखा सचिव बी.आर. धाकडे, नंदू उपाध्याय, ए.के. तिवारी, गणेश सिंह, सुरेश घासीराम उपस्थित होते.