आठशेवर स्पर्धकांनी केली नोंदणी
भुसावळ– भुसावळ पोलीस दलातर्फे 8 एप्रिल रोजी होणार्या भुसावळ रन मॅरेथॉन स्पर्धेत शनिवारअखेर 800 वर स्पर्धकांनी नोंदणी केली. स्पर्धेसाठी भुसावळकरांनी अत्यंत उत्स्फूर्त दिला असून त्यात युवकांचा मोठा सहभाग असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. भुसावळ रनच्या पार्श्वभुमीवर रन समिती सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. तीन, पाच व 10 किलोमीटर अंतरासाठी तीन गटात स्पर्धा होत आहे. प्रवेश नोंदणीसाठी शहर पोलीस ठाणे व बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या बाहेर नाव नोंदणीसाठी टेबल लावण्यात आले होते.
असा आहे स्पर्धेचा मार्ग
त्यात तीन किलो मीटरसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान (डीएस ग्राऊंड) पासून लोखंडी पूल, अष्टभुजा देवी मंदिर, नवशक्ती आर्केड पासून युटर्न घेऊन पुन्हा डॉ. आंबेडकर मैदानावर स्पर्धक येतील. पाच किलोमीटर अंतरासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान (डीएस ग्राऊंड) पासून लोखंडी पूल, अष्टभुजा देवी मंदिर, नवशक्ती आर्केड, हॉटेल हेवन पासून युटर्न घेत पुन्हा मैदानावर स्पर्धक येतील तर 10 किलोमीटर अंतरासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान (डीएस ग्राऊंड) पासून लोखंडी पूल, अष्टभुजा देवी मंदिर, नवशक्ती आर्केड, हॉटेल हेवनपासून युटर्न घेत वसंत टॉकीज रीक्षा थांबा, दोन नंबरचा पेट्रोल पंपाजवळीून डाब्या बाजूला वळत सरदार वल्लभभाई पटेल पुतळा, कोनार्क हॉस्पीटल, वाय पॉइंटपासून युटर्न घेत पुन्हा मैदानापर्यत यायचे असल्याचे शहर ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांनी सांगितले. दरम्यान, स्पर्धेसाठी सिद्धीविनायक ग्रुप तसेच आमदार संजय सावकारे यांचे सहकार्य लाभले आहे.