भुसावळ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आयशर, इनोव्हा व दुचाकी वाहनाच्या झालेल्या विचित्र अपघातात वरणगाव येथील वायमनचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार, २६ डिसेंबर रोजी दुपारी 2.20 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत आयशर चालकाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील महामार्गावर कोणार्क हॉस्पिटलजवळ जळगावकडून येणार्या आयशर (एम.पी ०९ जीई ०७९२) ने मोटरसायकल (एम.एच १९ सी.ई) ७२७४ ला धडक दिली तसेच समोरुन येणार्या इनोव्हा (एम.एच.१९ एएम ३१३२) ला ही धडक दिली. या विचित्र अपघातात दुचाकीस्वार असलेले वायरमन राजेंद्र श्रावण धनगर (चिंचोले, ४२) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात इनोव्हा कारमधील एक प्रवासी जखमी झाला. त्याच्यावर गोदावरी हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहे. अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतुक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच वाहतुक व शहर पो.स्टेचे पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतुक सुरळीत केली. याबाबत शहर पो.स्टे. ला. संदीप प्रभाकर सावळे (रा. सिताराम नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरुन आयशर चालक (नाव माहित नाही) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो घटनास्थळावरुन पसार झाला. पुढील तपास पीएसआय के.टी. सुरळकर करित आहे. घटनेची माहिती मिळतातच वरणगाव येथील नगरसेवक बबलू धनगरांसह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.