भुसावळ। येथील रेल्वेच्या लोको शेडमधील भंगाराला बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मोठी आग लागल्याने यंत्रणेची मोठी धावपळ उडाली़ स्थानिक नगरपालिकेच्या तीन बंबांनी मोठ्या शर्थीने आग विझविण्यात यश आले. यापुर्वी सुध्दा याच ठिकाणी अशा घटना घडल्या आहे.तरी सुध्दा रेल्वे प्रशासन याकडे लक्ष का देत नाही. आग कोणत्या कारणांनी लागली यामागील कारण समजू शकले नाही.
आगीचे गौडबंगाल, लक्ष देण्याची गरज
रेल्वेच्या लोको शेड भागातील भंगार साहित्याला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आग लागली़ या आगीत मोठया प्रमाणावर भंगार जळाले तसेच रिकाम्या जागेवरील झाडे-झुडुपे जळून खाक झाली़ नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवल्यांनतर अग्नीशामक दलासह आरपीएफ कर्मचार्यांंनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल़े यापुर्वी सुध्दा याच भंगाराला आग लागली होती.त्यावेळेस सुध्दा अग्नीशामक दलाचा प्रश्न समोर आला होता. मध्ये रेल्वेचे डिव्हिजन कार्यालय असून मोठ्या प्रमाणात रेल्वेचे कार्यालय, पीओएच, एमओएच, रेल्वे यार्ड यासारखे महत्वाचे कार्यालय असतांना सुध्दा मध्य रेल्वे कडे त्यांची स्वतंत्र्य अग्नीशामक यंत्रणा नाही.ही मोठी गंभीर बाब आहे.तरी सुध्दा मध्य रेल्वे याकडे लक्ष देत नाही या मागील गौड बंगाल काय? दरवर्षी याठिकाणी आग कशी लागते. यात काही गैरप्रकार तर नाही ना? याकडे लक्ष देण्याची गरज आहे.