भुसावळ – भुसावळ रेल्वे यार्डातील उप स्टेशन मास्तर यांच्यावर अज्ञात इसमाने डोक्यावर धारदार शस्त्राने मारहाण करून जखमी केल्याची घटना 23 रोजी रात्री 11 वाजता घडली. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विनयकुमार रघुनाथ सिंग (27, रा.पीओएच कॉलनी, कंडारी) असे जखमी सहाय्यक स्टेशन मास्तरांचे नाव आहे. त्यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार 23 रोजी यार्ड कॅबिनजवळ उभे असतांना अज्ञात व्यक्तिने काही कारण नसतांना डाव्या भुवईवर, डोक्यावर तसेच उजव्या पायाच्या पंजावर मारहाण करून जखमी केले. जखमीवर जळगाव येथे उपचार सुरू असल्याने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर तो भुसावळ शहर पोलिसात वर्ग करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास उपनिरीक्षक कोळी करीत आहे.