भुसावळ- रेल्वे यार्डात कुठल्यातरी धावत्या गाडीखाली आल्याने अनोळखीचा मृत्यू झाला. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मुका व बहिरा असलेला 25 ते 30 वयोगटातील मयत हा रेल्वे रूळांवरील बाटल्या वेचण्याचे काम करीत असताना कुठल्यातरी रेल्वे गाडीचा त्याला फटका बसला व तो मृत झाल्याची घटना शनिवारी दुपारी अडीच वाजेपूर्वी घडली. खांबा क्रमांक 446/25-26 जवळ त्याचा मृतदेह आढळला. लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ओळख पटत असल्यास लोहमार्गच्या हवालदार संजीवनी तारगे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.