भुसावळ रेल्वे विभागाच्या नवीन सिनीयर डीसीएमपदी शिवराज मानसपुरे

युवराज पाटील यांची दिल्ली येथे लोकपाल विभागात बदली

भुसावळ : भुसावळ डीआरएम कार्यालयातील वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांनी दिल्ली येथे लोकपाल विभागात बदली झाली असून त्यांच्या जागेवर मुंबई येथून शिवराज मानसपुरे हे नवीन वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक म्हणून नियुक्त करण्यात आले असून त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला.

युवराज पाटील यांची दिल्लीत बदली
वरीष्ठ वाणिज्य प्रबंधकपदी 1 ऑगस्ट 2020 रोजी युवराज पाटील यांनी पदभार घेतला होता व त्यानंतर आता त्यांची दिल्ली येथे लोकपाल विभागात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून बदली झाली. पाटील यांच्या बदलीमुळे रीक्त होणार्‍या जागेवर मुंबई येथून वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक म्हणून शिवराज मानसपुरे यांची नियुक्ती झाली आहे. मानसपुरे यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता पदभार स्वीकारला.