भुसावळ रेल्वे स्टेशनवर आढळली दागिन्यांची बॅग

0

भुसावळ । येथील रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 3 वर एका बेवारस बँग आढळून आली. त्यात अडीच ते तीन लाखांचे दागिणे आहे. बुधवार 14 रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास ही बॅग आढळून आली. लोहमार्ग पोलीसांना याची माहिती मिळताच त्यांनी हि बॅग ताब्यात घेऊन दागिणे खरे आहेत कि, नाही याची सोनारांकडून खात्री करुन घेतली. दरम्यान आज मिळून आलेल्या बॅगेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होती.

रेल्वेच्या फलाट क्रमांक 3 वर पोलीस नाईक रविंद्र महादेव पाटील हे गस्तीवर असताना यांना फलाटावरील व्यावसायिकांनी गेल्या चार ते पाच तासांपासून येथे बेवारस बॅग पडलेली असल्याची माहिती दिली. पाटील यांनी बँग उघडून पाहिली असता या बँगेत एक सोन्याचा हार, 2 चैन, एक अंगठी, कानातील कर्णफुले, पायातील पैजण असा अडीच ते तीन लाखाचे दागिणे, देना बँकेचे पासबुक आणि कपडे असा ऐवज आढळून आला. लोहमार्ग पोलीसांनी बँगेत असलेल्या देना बँक पासबुक आधारे बँग मालकाचा तपास लावला. सदर बॅग शशी अनुप गुप्ता (रा. डहाणू, पश्‍चिम मुंबई) या महिलेची असल्याचे समजले. लोहमार्ग पोलीसांनी सदर बॅग आपल्या ताब्यात ठेवली असून याचा तपास सुरु आहे. याबाबत लोहमार्ग पोलीस स्थानकात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.