भुसावळ रेल्वे स्थानकाचे नाव उर्दू भाषेत टाकण्याबाबत जी.एम. यांना साकडे

0

भुसावळ- भुसावळ रेल्वे स्थानकाचे नाव उर्दू भाषेत टाकण्यात यावे, अशी मागणी भुसावळ दौर्‍यावर आलेले जी.एम.डी.के.शर्मा यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. देशभरात भुसावळ रेल्वे स्थानकाची ख्याती असून येथून देशभरात उर्दू भाषिक प्रवासी प्रवास करतात तसेच शहराचे उर्दू साहित्य, कवी, पत्रकार देशभरात चर्चित आहेत. यापूर्वीदेखील जी.एम. यांना या आशयाची मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली होती मात्र दखल घेण्यात न आल्याने दुसर्‍यांदा माजी नगरसेवक साबीर शेख यांनी निवेदन दिले. निवेदनावर गटनेता हाजी मुन्ना तेली, शेख सलीम सेठ चुडीवाले, उर्दू कवी हामीद भुसावली, साहित्यीक अहमद कलीम फैजपुरी, उर्दू पत्रकार सलाउद्दीन आदिब, अ‍ॅड.अहतेशाम मलिक, सलिम पिंजारी, डॉ.एजाज खान आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.