शहर वाहतूक शाखेची मोहिम ; 30 रीक्षाच उभ्या राहणार रांगेत
भुसावळ- भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेर बेशिस्तपणे रीक्षा लावून वाहतूक व्यवस्थेची कोंडी करणार्या रीक्षा चालकांना बाजारपेठ निरीक्षक देविदास पवार व शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक दीपक गंधाले यांनी सोमवारी सूचना देवून एका रांगेत रीक्षा लावण्याचे आदेश देताच रीक्षा चालकांनी आपापली वाहने रांगेत लावली. रेल्वे हद्दीतील शिवाजी पुतळ्यानजीक 30 रीक्षा चालकांना वाहने लावण्याची मुभा देण्यात आली असून रांगेबाहेत बेशिस्तपणे रीक्षा लावणार्यांवर कारवाई केली जाणार आहे.
रेल्वे परीसराने घेतला मोकळा श्वास
रेल्वे स्थानकाबाहेर रीक्षा थांबा असलातरी रीक्षा चालक बेशिस्तपणे वाहने उभी करीत असल्याने वाहनधारकांची कोंडी होत होती शिवाय प्रवाशांनाही मनस्ताप सोसावा लागत होता. याबाबत पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत सोमवारी सर्व रीक्षा चालकांना सूचना दिल्या. रेल्वे हद्दीतील जागेवर आता केवळ 30 तीन रीक्षा चालकांना वाहने लावता येणार असून तेथून शहरातील विविध भागात प्रवाशांची वाहतूक करता येणार आहे शिवाय डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अनधिकृतपणे लोटगाड्या लावणार्यांनाही हटवण्यात आल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे.