भुसावळ रेल्वे स्थानकावर सरकत्या जीन्यांचे उद्घाटन

0

पुणे व सुरत मार्गावर तांत्रिक कामे पूर्ण झाल्यानंतर नवीन गाड्या धावणार -खासदार

भुसावळ- भुसावळ रेल्वे स्थानकावरील सरकत्या जीन्यांचे मंगळवारी खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खडसे म्हणाल्या की, भुसावळ रेल्वे विभाग हायटेक होत असून डीआरएम यांच्याकडे दिलेल्या प्रस्तावांची कामे केली जात आहे शिवाय भुसावळसह रावेर, सावदा, मलकापूर, नांदूरा रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी अधिकधिक सुविधा पुरवल्या जात आहेत. प्रवाशांसाठी लिप्टची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून आपल्या खासदार निधीतून प्रवाशांना बसण्यासाठी 62 बाकडे दिल्याचे त्यांनी उद्घाटन कार्यक्रमानंतर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक तीनवरील व्हीआयपी कक्षात घेतलेल्या पत्रकार परीषदेत सांगितले.

तांत्रिक कामे झाल्यानंतर नवीन गाड्या सुरू होणार
मुख्य बसस्थानक व केला सायडींग बाजूला असलेल्या जुन्या पादचारी पुलाला सरकत्या जीन्यांचे उद्घाटन झाल्यानंतर पत्रकार परीषदेत खासदार खडसे म्हणाल्या की, भुसावळ रेल्वे स्थानकार संपूर्ण देशभरातून येणार्‍या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यानुसार रेल्वे स्थानकावर प्रवशांसाठी आवश्यक व्यवस्था, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चार वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. भुसावळ-पुणे व भुसावळ-नंदुरबार-सुरत-मुंबई या मार्गावर गाड्यांबाबच्या तांत्रीक बाबीपूर्ण केल्यावर नवीन गाड्या सुरू करण्यात येणार असल्याचे खडसे म्हणाल्या.
मलकापूर, नांदुरा स्थानकांवरील प्रवासी संख्या लक्षात घेता तेथेही सरकते जीने कार्यान्वित होणार असल्याची माहिती खासदारांनी देत भुसावळ स्थानकावर उतरत्या जीन्यांचे लवकरच काम पूर्ण होणार असल्याचे त्या म्हणाल्या. रावेर स्थानकावरील शेडची सुधारणा करण्यात येत असल्याचे सांगून विभागात होत असलेल्या स्वच्छतेच्या कामांमुळेच स्वच्छ स्थानकांच्या पहिल्या 36 स्थानकांमध्ये भुसावळ स्थानकाने क्रमांक पटकावल्याचे खडसे म्हणाल्या. प्रसंगी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, डीआरएम आर.के.यादव, सिनीयर डिसीएम सुनीलकुमार मिश्रा, डीआरयुसीसी सदस्य अनिकेत पाटील, पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, महिला आघाडीच्या अलका शेळके यांच्यासह नगरसेवक व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

खुर्च्यांचेही लोकार्पण
कार्यक्रमाच्या सुरुवातीला खासदारांच्या हस्ते स्थानकाच्या उत्तर भागातील सरकत्या जिन्याचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर प्लॅटफार्म क्रमांक चारवर खासदार निधीतून देण्यात आलेल्या 25 बेंचचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. भुसावळ विभागात एकूण 62 बेंच देण्यात आले असून त्यातील 25 भुसावळ स्थानकावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. दरम्यान, यानंतर बुकींग कार्यालयाकडील दुसर्‍या सरकत्या जीन्याचे उद्घाटनही करण्यात आले. प्रसंगी आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.सुनील नेवे, नगरसेवक युवराज लोणारी, नगरसेवक किरण कोलते, निर्मल (पिंटू) कोठारी, पिंटू ठाकुर, बापू महाजन, नगरसेवक मुकेश पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती गोलू पाटील, भालचंद्र पाटील, भाजपा शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, रेल्वेचे अभियंता चिखले, दीपक कुमार, प्रवीणसिंग तोमर, पवन बुंदेले, रमाशंकर दुबे, सुनील महाजन, नगरसेवक अ‍ॅड.बोधराज चौधरी यांच्यासह नगरसेवक व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.