भुसावळ रेल्वे स्थानकावर बाल सहाय्यता केंद्राचे उदघाटन

0

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील पहिले बाल सहाय्यता केंद्र

भुसावळ- 150 व्या महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने भुसावळ रेल्वे स्थानकावरील फलाट क्र. 1 व 3 च्या दरम्यान दादर्‍याखाली बाल सहाय्यता केंद्राचे उद्घाटन मंगळवारी भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांच्या हस्ते झाले.

समतोल प्रकल्पाचे काम गौरवास्पद -डीआरएम
डीआरएम आर.के.यादव यांनी भाषणात समतोल प्रकल्पाच्या कार्याचा गौरव करीत बालसहाय्य केंद्र अ दर्जा असलेल्या रेल्वे स्थानकावर सुरू करण्याचे सरकारचे आदेश असल्याचे सांगत भुसावळ रेल्वे स्थानकावर घरातून पळून आलेली व अन्य कारणांनी आलेल्या मुलांची संख्या पाहता येथे हे केंद्र सुरू करण्यात आल्याचे सांगितले.

भुसावळ विभागातील पहिलेच बाल सहाय्यता केंद्र
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात पहिलेच बाल सहाय्यता केंद्र भुसावळ रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आले आहे. रेल्वे स्थानकावर समतोलचे कार्य 24 तास सुरू राहणार असून या केंद्रामुळे कार्यास गती लाभणार आहे. अनेक स्वयंसेवी सूत्रसंचालन भानुदास येवलेकर यांनी तर आभार वैदेही देशपांडे यांनी मानले.

यांची होती प्रमुख उपस्थिती
स्टेशन संचालक जी.आर.अय्यर, ए.डी.चुटीले, दीक्षित, आर.एस.उपाध्याय, दिलीप चोपडा, केशव स्मृती प्रतिष्ठान सचिव रत्नाकर पाटील, राहुल पवार, आशिश पाटील, वैदेही देशपांडे, कादरभाई मेमन, स्वप्नील चौधरी, राजश्री डोलारे, सपना श्रीवास्तव, हेमंत भिडे उपस्थित होते. प्रास्ताविक समतोल प्रकल्प प्रमुख दिलीप चोपडा यांनी केले. समतोलचे कार्य भुसावळ आणि जळगाव रेल्वे स्थानकावर सुरू झाल्यापासून 1037 मुलांचे सहाय्य करण्यात आले असून 674 मुले बालगृहात तर 364 बालकांना त्यांच्या घरी पोहचविण्यात आल्याचे ते म्हणाले.