भुसावळ रेल्वे स्थानकावर सरकत्या जीन्यांचे उद्घाटन

0

क्रीडामैदानावर जॉगिंग ट्रॅकचेही खासदार रक्षा खडसेंनी केले उद्घाटन ; वयोवृद्ध प्रवाशांची होणार सोय ; लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती

भुसावळ- भुसावळ- रेल्वे स्थानकावरील दोन्ही बाजूच्या सरकत्या जीन्यासह स्पोटर्स् ग्राऊंडवरील जॉगिंग पार्कचे उद्घाटन गुरुवारी सकाळी सात वाजता खासदार रक्षा खडसे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. गेल्या काही दिवसांपूर्वीच रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी सरकत्या जीन्यांचे काम पूर्ण केले होते. या जीन्यांमुळे आता रेल्वे प्रवाशांसह वयोवृद्ध प्रवाशांची दादर चढ-उतार करण्यासाठी होणार फरफट थांबणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

खासदारांच्या हस्ते जीन्याचे लोकार्पण
गुरुवारी पहाटे खासदारांचे मुंबईहून आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते सरकत्या जीन्यांचे लोकार्पण करण्यात आले. प्रसंगी खासदारांसह लोकप्रतिनिधींनी जीन्यावरून प्रवासही केला तसेच पदाधिकार्‍यांनी जीन्याचा वापर करून पाहिला व घोषणाबाजी केली.

यांची होती कार्यक्रमास उपस्थिती
आमदार हरीभाऊ जावळे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य व भाजयुमो शहराध्यक्ष अनिकेत पाटील, भाजपा शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, नगरसेवक युवराज लोणारी, प्रमोद नेमाडे, शैलजा पाटील, रमाशंकर दुबे, युवा मोर्चाचे हिमांशू दुसाणे, बापू महाजन, निलेश वारके, माजी नगरसेवक शेखर इंगळे, सतीश सपकाळे, प्रमोद पाटील
लक्ष्मण सोयंके तसेच एडीआरएम मनोज सिन्हा, सिनी.डीसीएम सुनील मिश्रा, सिनी.डीईएन राजेश चिखले, डीसीएम व्ही.पी.दहाट, सिनी डीईईजी जी.के.लखेरा, डीईएन एस.डब्ल्यू.एम.एस.तोमर, स्टेशन संचालक जी.आय.अय्यर व रेल्वेच्या अन्य विभागातील अधिकार्‍यांची उपस्थिती होती.

खेळकुद मैदानावर दोन जॉगिंग ट्रॅक
रेल्वेच्या प्रशस्त क्रीडा मैदानावर चालण्यासाठी तसेच धावण्यासाठी दोन स्वतंत्र जॉगिंग ट्रॅकची निर्मिती करण्यात आली असून त्याचेही खासदारांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी काही धावपटूंनी ट्रॅकवरून धावण्याचाही आनंद लूटला. जॉगिंग ट्रॅक वापरासाठी रेल्वे प्रशासनाकडून नाममात्र शुल्क आकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.