भुसावळ : रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक पाचवरील पाण्याच्या टाकीजवळ सोमवार, 6 रोजी मध्यरात्री तीन वाजता 28 ते 30 वयोगटातील तरुणाचा मृतदेह आढळला. तरुणाचा मृत्यू दीर्घ आजाराने झाल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताचा रंग सावळा, दाढी वाढलेली तसेच डाव्या हाताला तीनच बोटे आहेत व अंगात ब्लू टी शर्ट तसेच अंगात कार्बन रंगाची फुलपँट आहे. मयताबाबत ओळख पटत असल्यास भुसावळ लोहमार्गचे एएसआय मधुकर न्हावकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.