मध्य रेल्वेतील 27 रेल्वे सुरक्षा बल निरीक्षकांच्या बदल्या
भुसावळ– मध्य रेल्वेच्या पाच विभागातील 27 रेल्वे सुरक्षा बल निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी रेल्वे सुरक्षा बलाचे महानिरीक्षक अतुल श्रीवास्तव यांनी काढले. बदल्यांमध्ये भुसावळ विभागातील आठ निरीक्षकांचा समावेश आहे. भुसावळ रेल्वे स्थानक निरीक्षक व्ही.के.लांजीवार यांची अकोला येथे बदली झाली असून त्यांच्या जागी मुंबई येथून दिनेश नायर बदलून येत आहेत. अन्य बदली झालेले अधिकारी असे कंसात कोठून कोठे बदली झाली ते ठीकाण- अतुल टोके (भुसावळ क्राईम ब्रँच- सीएसएमटी, मुंबई), गोकुळ सोनोनी (जळगाव- चाळीसगाव), सत्येद्र यादव (खंडवा-मुंबई), राजेश बढे (अकोला-बडनेरा), नरेश सावंत (चाळीसगाव-कुर्ला), महेंद्र पाल (रोहा-जळगाव स्थानक) यांचा बदल्यांमध्ये समावेश आहे.