सचिवपदी सुधाकर सनांसे ः पदग्रहण समारंभ उत्साहात
भुसावळ- रोटरी क्लब ताप्ती व्हॅलीच्या नूृतन पदाधिकार्यांचा पदग्रहण समारंभ व्यंकटेश बालाजीमंदिरात झाला. डिस्ट्रिक्ट 3141 चे माजी प्रांतपाल बन्सीधर धुरंधर अध्यक्षस्थानी तर डिस्ट्रिक्ट 3030 चे विद्यमान प्रांतपाल राजीव शर्मा हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. सहाय्यक प्रांतपाल प्रसन्न गुजराथी, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक तसेच महेश फालक उपस्थित होते. नूतन अध्यक्ष डॉ.सुधीर शर्मा यांनी मावळते अध्यक्ष धमेंद्र मेंडकी यांच्याकडून आणि नूतन सचिव सुधाकर सनांसे यांनी तेजेस नवगाळे यांच्याकडून पदभार स्वीकारला. रोटरॅक्टर क्लब नाहाटा कॉलेज, रोटरॅक्ट तापी व्हॅली आणि रोटरॅक्ट कोटेचा कॉलेज यांचा पदग्रहण समारंभ सुद्धा सोबत पार पडला. रोटरॅक्टर नाहाटा कॉलेजच्या अध्यक्षा वेदश्री महेश फालक, सचिन निशा आहुजा, रोटरॅक्ट ताप्ती व्हॅलीचे अध्यक्ष लोकेश मुकेश कांसल, सचिव सुमित यावलकर, रोटरॅक्ट कोटेचा कॉलेजच्या अध्यक्षा नक्षत्रा देशमुख यांनी नूतन पदभार स्वीकारला.
रोटरीतजर्फे सशक्त समाजाची निर्मिती -धुरंधर
रोटरी ही सेवाभावी संस्था असून गेली 112 वर्षे अविरत समाजसेवा करीत आहे. रोटरीच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात. रोटरी एक सशक्त, सुदृढ समाज निर्माणाचे कार्य करते, असे प्रतिपादन माजी प्रांतपाल धुरंधर यांनी केले. रोटरी समाजाच्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहर्यावर आनंद निर्माण करते आणि जीवनात हास्य फुुलविते, असे प्रांतपाल राजीव शर्मा यांनी सांगितले. डी.एस.सत्यम आणि माधुरी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारिणी अशी- अध्यक्ष- डॉ.सुधीर शर्मा, सचिव- सुधाकर सनांसे, कोषाध्यक्ष- सी.ए. मुकेश अग्रवाल, डायरेक्टर- धमेंद्र मेंडकी, डॉ.रश्मी शर्मा, तानाजी पाटील, किरण बढे, आदिल खान, डॉ.ओमप्रकाश चौधरी, कुरेश वर्धावाला, प्रमोद पिंगळे, रानी छाबडा, डी.एस.सत्यम.