भुसावळ- नगरपालिकेच्या शाळा क्रमांक एकमधील विद्यार्थ्यांना शाळेच्या दप्तराचे वाटप रोटरी रेल सिटीतर्फे करण्यात आले. रोटरी रेल सिटीचे सचिव डॉ.मकरंद चांदवडकर यांनी त्यांचा मुलगा अमोघच्या वाढदिवसानिमित्त या प्रोजेक्टचे प्रायोजकत्व स्वीकारला. या प्रोजेक्टला रोटरी रेलसिटीचे अध्यक्ष महेंद्र (सोनू) मांडे, सचिव डॉ.मकरंद चांदवडकर, संदीप सुरवाडे, मनोज सोनार, उमेश घुले, अनिकेत पाटील, विशाल ठोके, पुरुषोत्तम पटेल, अमित भडंग, विशाल ठोके व चांदवडकर कुटुंबिय उपस्थित होते. मुख्याध्यापक साधना चौधरी व सहकार्यांनी परीश्रम घेतले.