भुसावळ- रेल्वे प्रवासात दागिन्यांची बॅग रेल्वेतच राहिली तर लोहमार्ग पोलिसांना याबाबत माहिती कळवल्यानंतर त्यांनी भुसावळात गाडीची तपासणी केल्यानंतर बॅग गाडीतच राहिल्याने महिला प्रवाशाला मोठा दिलासा मिळाला. पोलिसांनी त्यासाठी स्थानकात बंदोबस्तही लावला होता. बॅगेत दोन लाखांचे दागिने असल्याने प्रवाशांनी पोलिसांच्या सतर्कतेबद्दल धन्यवाद दिले.
बॅग पाहताच प्रवाशाला दिलासा
गुरुवारी देवळाली-भुसावळ शटलने अमृता पाटील ही विवाहिता पाचोरा ते जळगाव प्रवास करीत असताना जळगाव उतरल्या मात्र गाडीत बॅग राहिली. ही बाब घरी आल्यानंतर लक्षात येताच त्यांनी पतीसह जळगाव लोहमार्ग पोलिसांना कल्पना दिल्यानंतर भुसावळ स्थानकावर सूचित करण्यात आले. लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिलीप गढरी व उपनिरीक्षक त्र्यंबक वाघ यांनी कर्मचार्यांना सूचना केल्यानंतर गाडीची तपासणी केल्यानंतर सातव्या जनरल बोगीत बॅग पाहताच पोलिसांनाही दिलासा मिळाला. पंचांसमक्ष बॅग तपासल्यानंतर त्यात दोन लाखांचे दागिने सुखरूप असल्याने महिला प्रवाशाला मोठा दिलासा मिळाला. याकामी उपनिरीक्षक त्र्यंबक वाघ, प्रवीण बाराई, संजीवनी तारगे, धर्मेद्र ढोरे, अजीत तडवी आदींनी सहकार्य केले.