भुसावळ-वरणगाव महामार्गावर अपघात : आयशर चालकाचा जागीच मृत्यू

वरणगाव : महामार्गावरील कुशल ढाब्याजवळ उभ्या असलेल्या आयशर गाडीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या आयशर वाहनाने धडक दिल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी रात्री 9 वाजता घडला. या प्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. भुसावळ रस्त्यावर कुशल ढाब्यासमोर आयशर गाडी (एम.एच.40 बी.जी.7619) ही क्लीनर बाजूचे मागील टायर फुटल्याने उभी होती शिवाय पार्कींग इंडिकेटर लाईट व इतर झाडाच्या फांद्या लावण्यात आल्या होत्या मात्र भरधाव वेगाने येणारी आयशर (जी.जे.15 ए.टी.4883) धडकल्याने या वाहनावरील चालक अमोल श्रावणजी वाकोडे (कोल्ही एक, ता.बाभुळगाव, जि.यवतमाळ) यांचा मृत्यू झाला. अपघातात दोन्ही आयशर वाहनांचे नुकसान झाले. आयशर चालक आवेद खान अब्दुल मजीद खान (45, पोलिस लाईन टाकळी, काटेल रोड, नागपूर) यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.