भुसावळ वाहतूक शाखेला मिळाली अत्याधूनिक इलेक्ट्रॉनिक लाठी

0

रात्रीच्या वाहतूक काेंंडीसह अपघातात होणार मदत : 30 फायबर स्टीकही मिळाल्या

भुसावळ- शहर वाहतूक शाखेला 30 फायबर स्टीकसह अत्याधूनिक इलेक्ट्रॉनिक लाठी गुरुवारी प्राप्त झाली. शहरात सर्वाधिक गंभीर समस्या वाहतुकीची असून रात्री-बेरात्री वाहतूक ठप्प झाल्यास वा अपघातानंतर वाहतूक ठप्प झाल्यास ही इलेक्ट्रॉनिक लाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. या लाठीमध्ये रेड, ग्रीन प्रकारचे एलईडी असल्याने वाहतूक सुरळीत करणे सोयीस्कर ठरणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले म्हणाले. या शिवाय 30 फायबर लाठ्याही प्राप्त झाल्याचे ते म्हणाले. या कामी सहकार नगरातील भैय्या डिपार्टमेंट स्टोअर्सचे जितेंद्र पद्मनाभ सोनवणे यांचे सहकार्य लाभले.