भुसावळ विभागातील पालिकांमध्ये विषय समिती सदस्यांची निवड

0

भुसावळातील सहा समित्यांमध्ये प्रत्येकी 16 सदस्यांचा समावेश ; स्थायी समितीचीही निवड

भुसावळ- भुसावळ विभागातील पालिकांमध्ये गुरुवारी पालिकेतील विषय समिती सदस्यांची नावे नामनिर्देशीत करण्यासाठी बैठक झाली. भुसावळ पालिकेच्या विशेष सभेत सहा समिती सदस्यांची निवड करण्यात आली. सत्ताधारी भाजपातर्फे प्रत्येक विषय समितीत दहा सदस्यांना संधी देण्यात आली तर पालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या जनआधार विकास पार्टीतर्फे सहा सदस्यांची नावे सूचवण्यात आली. भुसावळप्रमाणे विभागातील पालिकांमध्ये सदस्यांची निवड करण्यात आली तर यावल पालिकेत बांधकाम समितीवर पदसिद्ध सभापती उपनगराध्यक्षांना देण्यावर मतभेद झाल्यानंतर घेण्यात आलेल्या मतदानानंतर सत्ताधार्‍यांनी आपले पारडे जड केले.

भुसावळात पालिकेत निवड प्रक्रिया शांतते
भुसावळ- पालिका सभागृहात आयोजित बैठकीत स्थायी समिती सदस्यांचीही निवड करण्यात आली. पीठासन अधिकारी तहसीलदार भाऊसाहेब थोरात होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष रमण भोळे, उपपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, गटनेता मुन्ना तेली व मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर आदींची उपस्थिती होती.

सार्वजनिक बांधकाम समिती
रवींद्र बाबूराव खरात, प्रतिभा वसंत पाटील, अमोल मनोहर इंगळे, अनिता एकनाथ सोनवणे, अ‍ॅड.बोधराज दगडू चौधरी, मेघा देवेंद्र वाणी, सईदा बी.शेख शफी, निर्मल रमेश कोठारी, चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे, राजेंद्र त्र्यंबक नाटकर तर जनआधारतर्फे शेख जाकीर सरदार, दुर्गेश ठाकूर, शेख शब्बीर जयाराबी, शेख सलीम शेख नादर, अ‍ॅड.तुषार पाटील, नीलिमा सचिन पाटील यांची निवड करण्यात आली.

शिक्षण समिती
मंगला संजय आवटे, शैलजा पुरूषोत्तम नारखेडे, प्रतिभा गिरीश महाजन, अ‍ॅड.बोधराज दगडू चौधरी, मुकेश नारायण पाटील, मनोज बन्सीलाल बियाणी, प्रा.सुनील मधुकर नेवे, रमेश गुरूनामल नागराणी, हाजी मुन्ना इब्राहीम तेली, युवराज दगडू लोणारी तर जनआधारतर्फे शबानाबी सिकंदर खान, शेख सलीम शेख नादर, अ‍ॅड.तुषार पाटील, कविता अशोक चौधरी, बागवान ईकबाल सरदार, अरुणाबाई सुरेश सुरवाडे यांची निवड करण्यात आली.

नियोजन व विकास समिती
लक्ष्मी रमेश मकासरे, युवराज दगडू लोणारी, राजेंद्र त्र्यंबक नाटकर, मुकेश नारायण पाटील, मनोज बन्सीलाल बियाणी, हाजी मुन्ना इब्राहीम तेली, रमेश गुरूनामल नागराणी, पुष्पाबाई रमेशलाल बत्रा, सोनल रमाकांत महाजन, किरण भागवत कोलते तर जनआधारतर्फे संगीता प्रदीप देशमुख, ईकबाल सरदार बागवान, नुरजहाँ आशिक खान, शेख सलीम शेख नादर, राहुल कैलास बोरसे, वैशाली चावदास पाटील यांची निवड करण्यात आली.

स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती
सुषमा किशोर पाटील, दीपाली परीक्षीत बर्‍हाटे, प्रा.दिनेश मोहनलाल राठी, अनिता एकनाथ सोनवणे, सोनी संतोष बारसे, निर्मल रमेश कोठारी, प्रमोद पुरूषोत्तम नेमाडे, चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे, मुकेश गणपत गुंजाळ, शैलजा पुरूषोत्तम नारखेडे तर जनआधारतर्फे वैशाली चावदस पाटील, संगीता देशमुख, शेख जाकीर सरदार, शेख शब्बीर जायराबी, दुर्गेश नारायण ठाकूर, मीनाक्षी नितीन धांडे यांची निवड करण्यात आली.

पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती
महेंद्रसिंग हनुमानसिंग ठाकूर, किरण भागवत कोलते, अमोल मनोहर इंगळे, राजेंद्र त्र्यंबक नाटकर, प्रा.दिनेश मोहनलाल राठी, प्रमोद पुरूषोत्तम नेमाडे, मुकेश गणपत गुंजाळ, सोनल रमाकांत महाजन, सुनील मधुकर नेवे, शोभा अरुण नेमाडे तर जनआधारतर्फे ईकबाल सरदार बागवान, राहुल कैलास बोरसे, शेख जाकीर सरदार, साधना रवींद्र भालेराव, कविता अशोक चौधरी, मीनाक्षी नितीन धांडे यांची निवड करण्यात आली.

महिला व बालविकास समिती
सविता रमेश मकासरे, सोनल रमाकांत महाजन, प्रतिभा वसंत पाटील, प्रतिभा गिरीश महाजन, सोनी संतोष बारसे, मेघा देवेंद्र वाणी, सईदा बी.शेख शफी, दीपाली परीक्षीत बर्‍हाटे, शोभा अरुण नेमाडे तर जनआधारतर्फे कविता अशोक चौधरी, अरुणाबाई सुरेश सुरवाडे, शबानाबी सिकंदर खान, मीनाक्षी नितीन धांडे, नीलिमा सचिन पाटील, नुरजहाँ आशिक खान यांची निवड करण्यात आली.

स्थायी समिती सदस्यांची निवड
सत्ताधारी भाजपातर्फे शोभा अरुण नेमाडे, सोनल रमाकांत महाजन यांची स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली तर विरोधी जनआधार विकास पार्टीतर्फे साधना रवींद्र भालेराव यांचे नाव सूचवण्यात आले.