भुसावळ विभागातील प्रमुख स्थानकांवर मिळणार आता प्लॅटफार्म तिकीट

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केवळ आरक्षीत रेल्वेगाड्या धावत असल्याने आरक्षीत तिकीट असलेल्या रेल्वे प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात तपासणी करून सोडण्यात येत होते मात्र पाहुण्यांना रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यासाठी येणार्‍या नातलगांसाठी प्लॅटफार्म तिकीट बंद करण्यात आल्याने त्यांना रेल्वे स्थानकाबाहेरूनच घरचा रस्ता धरावा लागत होता. या अनुषंगाने आता भुसावळ विभागातील काही नामांकित स्थानकांवर 11 मार्च ते 10 जून दरम्यान प्लॅटफॉर्मची तिकिटे दिली जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले असून प्लॅटफार्म तिकीटची किंमत 50 रुपये ठेवण्यात आली आहे. भुसावळ विभागात नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, अमरावती, खंडवा या स्थानकावर प्लॅटफार्म तिकीट आता उपलब्ध होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.