भुसावळ विभागातील 11 स्थानकांवर मोबाईल अ‍ॅपद्वारे मिळणार तिकीट

0

रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा ; रिचार्ज रकमेवर पाच टक्के अतिरिक्त बोनस

भुसावळ – रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळण्याकडे रेल्वे प्रशासनाचा कल असून त्या अनुषंगानेच भुसावळ विभागातील 11 स्थानकांवर मोबाईल अ‍ॅपद्वारा अनारक्षित (सर्वसाधारण) तिकीट काढण्याची सोय सुरू करण्यात आली आहे. डिजिटल व्यवहार वाढण्यासाठी आर-वॉलेटच्या प्रत्येक रिचार्ज व्हॅल्यूवर पाच टक्के अतिरिक्त बोनस दिला जात असून 10 हजारांपर्यंत आता रिचार्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, पाच टक्के अतिरीक्त बोनसची सुविधा 24 मे पासून पुढील तीन महिन्यांपर्यंत राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.

या स्थानकांवरून काढता येईल मोबाईलद्वारे तिकीट
भुसावळ विभागातील नासिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, अमरावती, बर्‍हाणपूर या रेल्वे स्थानकांवरून प्रवाशांना मोबाईल अ‍ॅपद्वारे अनारक्षित तिकीट काढता येणार आहे. रेल्वे प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी केले आहे.