भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये 1 जूनपासून काही रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असलातरी राज्यांतर्गत प्रवासाला मात्र बंदी घालण्यात आली असून प्रवाशांना बाहेरच्या राज्यात मात्र नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रवास करावा लागणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, भुसावळ विभागातून 1 जूनपासून अप-डाऊन मिळून 38 रेल्वेगाड्या धावणार आहेत.
या गाड्या धावणार भुसावळ विभागातून
गाडी क्रमांक 01016/01015 अप/डाउन गोरखपूर लोकमान्य तिलक टर्मिनस कुशीनगर एक्स्प्रेस, गाडी क्रमांक 01061/01062 अप/डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस दरभंगा पवन एक्स्प्रेस, गाडी क्रमांक 01071/ 01072 अप/डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस वाराणसी कामायनी एक्सप्रेस, गाडी क्रमांक 01093/01094 अप/डाउन मुंबई वाराणसी महानगरी एक्सप्रेस, गाडी क्रमांक 02533/02534 अप/डाउन मुंबई लखनऊ पुष्पक एक्स्प्रेस, गाडी क्रमांक 02617/02618 अप/डाउन हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस, गाडी क्रमांक 02629/02630 अपा/डाउन न्यू दिल्ली यशवंतपूर कर्नाटका संपर्क क्रांती एक्सप्रेस गाडी क्रमांक 02715/02716 अप डाउन नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस, गाडी क्रमांक 02810/02809 अप डाउन हावडा-मुंबई मेल, गाडी क्रमांक 02833/02834 अप/डाऊन अहमदाबाद हावडा एक्सप्रेस, गाडी क्रमांक 09045/ 09046 अप/डाउन सुरत छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस, गाडी क्रमांक 03201/03202 अप/डाउन पटना लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्सप्रेस, गाडी क्रमांक 02141/02142 अप/डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्सप्रेस, गाडी क्रमांक 02541/02542 अप डाउन गोरखपुर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, गाडी क्रमांक 02149/02150 अप/डाऊन पुणे दानापुर एक्सप्रेस, गाडी क्रमांक 05645/05646 अप/डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस गोवाहाटी एक्सप्रेस, गाडी क्रमांक 09090/09089 अप/डाऊन अहमदाबाद मुजफ्फरपुर एक्सप्रेस वाया सुरत, गाडी क्रमांक 09084/09083 अप/डाऊन अहमदाबाद ते गोरखपूर एक्सप्रेस व्हाया सुरत, गाडी क्रमांक 02779/02780 अप/डाऊन वास्को दि गामा हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस भुसावळ विभागातून धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.