भुसावळ विभागात आज रेल्वेचा मेगाब्लॉक : 11 गाड्या होणार प्रभावीत

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात बर्‍हाणपूर येथे इंटरलॉकींसह दुसखेडा-सावदा दरम्यान गर्डर टाकण्यासाठी बुधवार, 19 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येत असून त्यामुळे अप-डाऊन मार्गावरील तब्बल 11 गाड्या प्रभावीत (उशिराने) होणार आहे. रेल्वे प्रवाशांनी गैरसोयीची दखल घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

हतनूरसह ब्रिजसह बर्‍हाणपूरला होणार काम
बर्‍हाणपूर येथे इंटरलॉकींचे तसेच दुसखेडा-सावदा दरम्यान सकाळी 8.20 ते 1.55 दरम्यान प्लेट गर्डर्स, रोडचे लिफ्टिंगचे काम केले जाणार आहे त्यामुळे या वेळेत अप-डाऊन मार्गावरील गाड्या ठिकठिकाणी थांबवण्यात येणार आहेत तसेच वरील एकाचवेळेत दोन ठिकाणी स्वतंत्रपणे रेल्वेतर्फे कामे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या गाड्या धावणार विलंबाने
डाऊन गाडी क्रमांक 22538 लोकमान्य टिळक टर्मिनल-गोरखपूर कुशीनगर
गाडी क्रमांक 15645 लोकमान्य टिळक-गुवाहाटी तसेच अप 15646 गुवाहाटी-एलटीटी, अप गाडी क्रमांक 12533 लखनऊ-मुंबई, डाऊन 22538 एलटीटी-गोरखपूर, 19483 अहमदाबाद-बरौनी एक्स्प्रेस बर्‍हाणपूर येथे थांबवण्यात येणार असून त्या विलंबाने धावणार आहेत तसेच गाडी क्रमांक 12628 नवी दिल्ली-बंग्लोर ही असीरगडला, 12166 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनल्स ही नेपानगरला, 19483 अहमदाबाद-बरौनी एक्सप्रेस भुसावळला. अप 20103 लोकमान्य टिळक टर्मिनल-गोरखपूर एक्स्प्रेस भुसावळला, 22183 लोकमान्य टिळक टर्मिनल-फैजाबाद एक्स्प्रेस भादलीला, 12779 डाउन वास्को दी गामा-निजामुद्दीन एक्सप्रेस जळगावला, 15017 लोकमान्य टिळक टर्मिनल-गोरखपूर एक्सप्रेस शिरसोली येथे थांबवण्यात येणार आहे. रेल्वेच्या ब्लॉकमुळे रेल्वे गाड्या उशिराने धावणार असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.