भुसावळ विभागात आजपासून प्लॅटफॉर्म तिकीट सुरु

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्लॅटफार्म तिकीट विक्री बंद केल्याने स्थानकावर नातेवाईकांना सोडण्यासाठी जाणार्‍या नागरीकांना मोठा मनस्ताप सोसावा लागत होता मात्र आता पूर्ववत प्लॅटफार्म तिकीटांची विक्री सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासन द्वारा भुसावळ विभागातील सर्व स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्री सुविधा 11 जूनपासून कार्यान्वीत करण्यात आला असून सर्व स्थानकांसाठी प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत दहा रुपये असणार आहे.