भुसावळ : भुसावळ विभागातील 24 ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी सकाळपासून मतदानास सुरुवात झाली. अतिशय संथगतीने मतदान होत असल्याचे विभागात चित्र आहे. भुसावळ तालुक्यील तीन ग्रामपंचायतीसाठी सकाळी 11.30 वाजेपर्यंत 28 टक्के तर यावल तालुक्यातील सात ग्रामपंचायतीसाठी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत 13.15 टक्के मतदान झाले तर 11.30 वाजेपर्यंत 34.30 टक्के मतदान झाले. त्यात दोन हजार 171 पुरूष तर दोन हजार 358 स्त्री मतदारांनी हक्क बजावला. रावेर तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीसाठी 11.30 वाजेपर्यंत 25.24 टक्के मतदान झाले.