भुसावळ विभागात जय श्रीरामांच्या जयघोषात शिवसैनिकांनी केली महाआरती

0

अयोध्येतील शरयू नदीकाठी महाआरतीला सुरुवात होताच मंदिरांमध्ये घंटानिणाद ; जय भवानी, जय शिवाजीचा गजर

भुसावळ- अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीसाठी शरदू नदीच्या तिरावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी रात्री महाआरतीला सुरुवात करताच भुसावळ विभागातील श्रीराम मंदिरांमध्येही घंटानिणाद करीत शिवसैनिकांनी महाआरती केली. प्रसंगी उद्ध ठाकरे आगे बढोच्या घोषणा देण्यात आल्या तसेच जय भवानी, जय शिवाजी, आधी राम मंदिर नंतर सरकारचा नारा देत शिवसैनिकांनी शक्तीप्रदर्शन केले. मुक्ताईनगरात सुवासिनींनी भंसाली ट्रेडर्स ते श्रीराम मंदीर अशी रस्त्यावर सुबक रांगोळी काढून लक्ष वेधले.

भुसावळात अयोध्येत शरयू आरती सुरू होताच श्री राम जयघोष
भुसावळ- अयोध्येत शरयू मआआरती झाल्यानंतर भुसावळातील कानाकोपर्‍यातून असंख्य शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी, रामभक्तांच्या उपस्थित म्युनसीसिपल पार्क येथील राम मंदिरांमध्ये रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर, भुसावळ विधानसभा संपर्क प्रमुख विश्राम साळवी, तालुका प्रमुख समाधान महाजन, रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललित मुथा, बजरंग दलाचे गोपीसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात शनिवारी सायंकाळी शेकडो शिवसैनिकांनी महाआरती करून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

भजनी मंडळ व वारकर्‍यांचा सहभाग
भुसावळ शहरांच्या विविध भागांमध्ये यावेळी शिवसैनिकांनी वातावरण निर्मिती करून महाआरतीच्या वेळी मंदिराच्या ठिकाणी सजावट व विद्युत रोषणाई केली. गणपती, शंकर, दुर्गा माता, राम आणि हनुमानाची आरती म्हणत सरकारला राम मंदिर लवकर बनवण्याची सुबुद्धी देवो, अशी प्रार्थना करण्यात आली. प्रसंगी जुना सातारा व विठ्ठल मंदिर वॉर्डातील वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकार नगरातील महिला भजनी मंडळाने सुद्धा आरतीत सहभाग नोंदवून विविध भजनांनी वातावरण भक्तिमय केले.

भुसावळ तालुक्यातील राम मंदिर घंटानादाने दुमदुमले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार्‍या महाआरतीचे व अयोध्या दौर्‍याचे मोठे कटआउट, होर्डिंग लावले होते. यावेळी मराठी भाषेतील सर्व देवांच्या आरत्या मोठ्या आवाजात ध्वनींक्षेपकावरून लावण्यात आल्या. दक्षिण व उत्तर भारतीय नागरिकदेखील या महाआरतीत मोठ्या संख्येने सहभागी झाले. महाआरतीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी शिवसेना शाखांमधून शिवसैनिक ‘जय श्रीराम’ असा जयघोष करीत पोहोचले. महाआरतीला अनेक हिंदू संघटनांनी पाठिंबा दिला, शिवसैनिकांनी हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर, फिर सरकार असा जयघोष करण्यात आला.

यांचा होता महाआरतीत सहभाग
शिक्षकसेनेचे हेमंत चौधरी, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, उपतालुका प्रमुख मनोहर बारसे, शहर प्रमुख निलेश महाजन, बबलू बर्‍हाटे, शहर संघटक योगेश बागुल, सुनील बागले, ग्राहक संरक्षक तालुका प्रमुख देवेंद्र पाटील, महिला आघाडी जिल्हा संघटीका पुनम बर्‍हाटे, तालुका संघटीका उज्ज्वला बागुल, शहर संघटीका भुराबाई चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख गोकुळ बाविस्कर, दत्तू नेमाडे, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, स्वप्नील सावळे, जवाहर गौर, राकेश चौधरी, सोनी ठाकूर, ग्राहक संरक्षक शहर प्रमुख मनोज पवार, शरद जोहरे, विक्की चव्हाण, सोपान भोई, किशोर शिंदे, अशोक जाधव, दिवाकर विसपुते, रणजीत यादव, सुरेंद्र सोनवणे, विकास खडके, पिंटू भोई व सर्व अंगीकृत संघटना पदाधिकार्‍यांनी परीश्रम घेतले.

यावलच्या श्रीराम मंदिरात महाआरती
यावल- शनिवारी सायंकाळी सातोद रोडवरील श्री राम मंदिर (श्री शनि मंदिर) मध्ये मोठया भक्तिमय वातावरणात महाआरती करण्यात आली. नगराध्यक्ष सुरेखा कोळी व शिवसेना उपतालुका प्रमुख शरद कोळी यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली. शिवसैनिकांनी प्रभू श्रीरामचंद्र की जय, जय भवानी-जय शिवाजी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे सात है, हर हिंदुकी यही पुकार, पहिले मंदिर फिर सरकार अश्या विविध घोषणा दिल्याने परीसर दुमदुमला. प्रसंगी शिवसेना जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील, शिवसेना जिल्हा उपसंघटक दीपक बेहेडे, शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे, शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, शिवसेना तालुका संघटक गोपाल चौधरी, शिवसेना उपतालुका प्रमुख शरद कोळी, विनायक अप्पा, शिवसेना उपतालुका संघटक पप्पू जोशी, शिवसेना शहर संघटक सुनील बारी, शिवसेना माजी तालुका प्रमुख विजयसिंग पाटील, आदिवासी सेना तालुका संघटक हुसेन तडवी, महिला शहर संघटक सपना घाडगे, शहर उपप्रमुख संतोष धोबी, किरण बारी, युवासेना उपशहर प्रमुख सागर बोरसे यांच्यासह यावल तालुका शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व तालुक्यातील श्रीराम भक्त यावेळी उपस्थित होते.

मुक्ताईनगरात सुवासिनींनी काढल्या रांगोळ्या
मुक्ताईनगर- शनिवारी सायंकाळी सहा वाजता मुक्ताईनगर येथील श्रीराम मंदीरात हजारो महीला व शिवसैनिक तसेच श्रीराम भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागाने महाआरती सोहळा पार पडला. प्रभाग क्रमांक 14 मधील सुवासिनींनी भंसाली ट्रेडर्स ते श्रीराम मंदीर अशी रस्त्यावर सुबक रांगोळी काढली. परीसर ध्वज व पताकांनी सुशोभीत करण्यात आला. प्रसंगी रावेर लोकसभा संपर्क प्रमुख उषा मराठे, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, जिल्हा संघटक हभप ज्ञानेश्वर जळकेकर, हभप रवींद्र हरणे महाराज, हभप उद्धव महाराज , डॉ.राहुल ठाकोर, डॉ.प्रदीप गणेश पाटील, महिला आघाडी उपजिल्हा संघटक सुषमा बोदडे, तालुका संघटक शोभा कोळी, उपतालुका संघटक उज्वला सोनवणे, शहर संघटक सरीता कोळी, उपशहर संघटक शारदा भोई, विद्या भालशंकर, सुनीता कोळी, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, गोपाळ सोनवणे, महेंद्र मोंढाळे, राजु हिवराळे, गणेश टोंगे, वसंत भलभले, राजेंद्र तळेले, विकास राजपूत, दिलीप चोपडे, प्रवीण चौधरी, नगरसेविका सविता भलभले, राजू कांडेलकर, नितीन कांडेलकर, संदीप बगे, पंकज पांडव, सतीश नागरे, भास्कर कोळी यांच्यासह असंख्य हजारो शिवसैनिक व महिला उपस्थित होत्या.

प्रभाग क्रमांक 12 मधून टाळ, मृदंगाच्या गजरात दिंडी सोहळा
प्रभाग क्र.12 चे नगरसेवक संतोष मराठे यांच्या पत्नी कीर्तनकार हभप दुर्गा संतोष मराठे यांच्या संकल्पनेतुन प्रभाग क्रमांक 12 मधील हनुमान मंदीर ते श्रीराम मंदीर अशी भव्य टाळ, मृदुंगाच्या गजरात दिंडी सोहळा काढण्यात आला तर महाआरतीला वारकरी परंपरेची सांगड मिळाल्याने अध्यात्मिक भावही दिसून आला. हभप रवींद्र रणे महाराज व हभप ज्ञानेश्वर महाराज , जळकेकर यांनी प्रसंगी व्यासपीठावरुन मार्गदर्शन करतांना श्रीराम मंदीर हा प्रत्येक हिंदुच्या आस्थेचा विषय असल्याने सरकारने श्रीराम जन्मभुमीवर लवकरात लवकर मंदिर बांधकामाचा मार्ग मोकळा करावा व श्रीराम मंदीराचा वादाचा इतिहासावर उलगडा केला.