भुसावळ : नववर्षाच्या स्वागतासाठी झिंगून वाहन चालवणार्या 20 तळीरामांवर भुसावळ विभागात 31 डिसेंबर रोजी पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले. या कारवाईने तळीरामांची झिंग चांगलीच उतरली. त्यासोबतच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघण करणार्या 61 दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
भुसावळ विभागात मद्यपींवर कारवाई
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ विभागात मद्य पिवून वाहन चालवणार्या 20 मद्यपींवर कारवाई करण्यात आली. त्यात भुसावळ तालुका हद्दीत एक, नशिराबाद चार, भुसावळ शहर सहा, बाजारपेठ तीन तर शहर वाहतूक शाखेतर्फे सहा जणांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय वाहतुकीचे नियम मोडणार्या एकूण 61 दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अवैधरित्या गावठी दारू विकणार्या सात जणांवर विभागात स्वतंत्र कारवाई झाल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.