रेल्वे महसुलात 104 टक्के वाढ ; उत्कृष्ट काम करणार्या कर्मचार्यांचा गौरव
भुसावळ- भुसावळ विभागाचे मंडळ वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली 1 ते 19 मे दरम्यान भुसावळ विभागात विना तिकीट प्रवास करणार्यांसह अनधिकृत फेरीवाले तसेच आरक्षण नसताना रीझर्व्ह डब्यातून प्रवास करणार्या प्रवाशांविरुद्ध धडक मोहिम राबवत तब्बल 47 हजार 888 केसेसच्या माध्यमातून दोन कोटी 95 लाख 91 हजार 267 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. गतवर्षी 24 हजार 551 केसेसच्या माध्यमातून एक कोटी 45 लाख 35 हजार 782 रुपये दंड वसुल झाला होता तर यंदा या रकमेत 104 टक्के वाढ झाली आहे.
उत्कृष्ट कामाचा गौरव
तिकीट निरीक्षक विनय ओझा यांनी 10 मे रोजी केवळ एकाच दिवसात दोन लाख 35 हजार 130 रुपयांचा दंड वसुल करून गौरवास्पद कामगिरी केल्याने त्यांचा डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्याहस्ते रोख पुरस्कार व प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला. दरम्यान, रेल्वे प्रवाशांनी नियमानुसार रेल्वे प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.