भुसावळ विभागात बाल दिन उत्साहात

0

विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे आयोजन

भुसावळ: ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये पंडित जवाहर नेहरू (बाल दिन) यांच्या जयंती निमित्त विवीध कार्यक्रम झाले. प्रिंसीपल निना कटलर यांनी पंडीत जवाहर नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण कार्यक्रमास सुरवात केली. नेहरु यांच्या जिवणाार निना कटलर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पालकवर्ग उपस्थित होता.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्यध्यापिका नीना कटरल यांच्यासह संपूर्ण शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

पोदार इंटरनॅशनल स्कूल

14 नोव्हेंबर बाल दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हाच दिवस बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. बालदिवसा निमित्त शाळेतील शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थी बालकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.शिक्षकांनी विद्यार्थांसमोर शाळेची सुरुवात सकाळच्या प्रार्थनेने केले. नंतर वर्गातील विविध शिक्षकांच्या तासिकेला विद्यार्थांची प्रतिक्रिया नाटिकेच्या माध्यामातून सादर केली या नाटिकेचे आयोजन ज्योती आदुर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. तसेच आजचा विद्यार्थी मैदानी खेळ विसरत चालला असून मोबाईल आणि संगणक यांसारख्या साधनानमध्ये जास्तीत जास्त वेळ घालतांना दिसतो यासाठी शिक्षकांनी कालातीत झालेले खेळ जसे लंघडी,खो-खो,कबड्डी,गोट्या,टायर चालवणे,भवरे फिरवणे, लगोरी,झुकझुक गाडी, सायकलींग, दोरीवरच्या उड्या, लापाचुपी,माझ्या मामाचे पत्र हरवले, अंधेरी कोशिम्बरी,रस्सीखेच अशे खेळ विद्यार्थांसमोर शिक्षकांनी गाण्याच्या तालावर खेळ खेळले या खेळाचे आयोजन जितेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यात आले.अंजली कुलकर्णी यांनी समुहगायन शिक्षकांच्या सहायाने सादर केले.कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील सर्वे विद्यार्थी गाण्याच्या तालावर थिरकले.शाळेचे प्राचार्य विनयकुमार उपाध्याययांनी विद्यार्थांना बालदिवसाच्या सुभेच्छ्या दिल्या व विद्यार्थांनी मैदानी खेळ सुद्धा खेळले पाहिजे कालातीत झालेले खेळ खेळले पाहिजे असे ते असे संबोधिले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इयत्ता 12 वीचे विद्यार्थी सिद्धांत खंडारे व रिया सिंग यांनी केले.कार्यक्रमाला पोदार जम्बो किड्स चे मुख्याध्यापिका मनीषा शृंगी,शाळेचे व्यवस्थापक रामदास कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिमा पाटील,नीलम अग्रवाल, एस्तर विंन्सेंट, रेखा मुळे, वंदना नाईक,प्रकाश दलाल तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांंनी परिश्रम घेतले.

कंडारी जी.प शाळा

तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत दि. 14 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिनानिमित्त सिनम फिरोज पिंजारी आणि इस्त्राईल सलीम देशमुख या दोन्ही बालकांच्या हस्ते नेहरूजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रारंभी विनोद जयकर यांनी बालदिनाचे महत्व सांगितले. गणेश तांबे यांनी पंडित नेहरू यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेतला. मंजूषा पाठक व ज्योती वाघ यांनी गोष्ट सांगून प्रबोधन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिक गीते गावून बालदिन साजरा केला. दुपारी माध्यान्ह भोजनात गोड पदार्थ शिरा देण्यात आला. यशस्वीतेसाठी विनोद जयकर, गणेश तांबे, साधना भोईटे, सुनंदा भारूडे, मंजूषा पाठक, सविता निंभोरे, ज्योती वाघ, डॉ. जगदीश पाटील आदींनी परिश्रम घेतले.