भुसावळ विभागात भारतीय संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह संविधान प्रतिमेचे ठिकठिकाणी झाले पूजन

भुसावळ- भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने 18 दिवसानंतर भारताची राज्यघटना संविधान तयार करण्यासाठी अहोरात्र परीश्रम करून भारतातील विविध जाती व धर्म याचा अभ्यास करून 26 नोव्हेंबर 1950 या दिवशी भारताचे पंतप्रधान व राष्ट्रपती यांना संविधान सुपूर्द केल्याने 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून भुसावळ विभागात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावल शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली तसेच ठिकठिकाणी संविधानाच्या प्रतीचे वाटप करण्यात आले तसेच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 26/11 रोजी झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या शहिदांना व नागरीकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावल शहरात संविधान प्रतिमेचे पूजन
यावल- संविधान दिनानिमित्त यश एंटरप्राईजेससमोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान प्रतिमेला हार अर्पण करून पूजन करण्यात आले. या प्रसंगी संविधानाचे वाचन करण्यात आले. माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील, यावल नगरपालिका गटनेता राकेश कोलते, पंचायत समिती गटनेते शेखर पाटील, गणेश महाजन, धीरज महाजन, मुबारक तडवी, राजेश करांडे, एजाज देशमुख, शेख असलम शेख नबी, फारुख हाजी, देशोन्नतीचे पत्रकार भरत कोळी, रमेश जोगी, प्रभाकर बारी, राजू फालक, आसीफ खान, अमोल बारी, देशदूत पत्रकार अरुण पाटील आदींची उपस्थिती होती.

यावल शहरात दुचाकी रॅली
यावल- भारतीय संविधान दिनानिमित्ताने यावल तालुक्यात भारतीय संविधानाच्या प्रतीचे वाटप करण्यात आले तसेच यावल शहरातून मोटारसायकल रॅली बहुजन समाज पार्टीतर्फे काढण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रॅली बोरावल गेटपर्यंत काढण्यात आली. रॅलीचे रूपांतर सभेत झाले. बहुजन समाज पार्टीचे प्रमोद पारधे, नारायण अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी सुनील गजरे, विकास मेढे, विकी गजरे, बबलू गजरे, प्रदीप गजरे, दिलीप तायडे, रत्नाकर सोनवणे, किरण भालेराव, सागर विकास वाघ, संदीप तायडे, प्रकाश मनोज पारधे, निलेश तायडे, सचिन पारधे आदींनी यशस्वितेसाठीभ परीश्रम घेतले.

संविधान दिनानिमित्त कार्यक्रम
भुसावळ- सीआरएमएस पीओएच शाखेद्वारा शाखा कार्यालयसत संविधान दिवसानिमित्त कार्यक्रम झाला. सुरुवातीला शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मंडल अध्यक्ष व्ही.के.समाधिया व झोंनल वर्कशाप सचिव पी.एन.नारखेडे यांच्या हस्ते संविधान आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मंडल अध्यक्ष व्ही.के.समाधीया व झोनल वर्कशाप सचिव पी.एन.नारखेडे, अभय आखाडे, किशोर कोलते, मेघराज तल्लारे, डी.यु.इंगळे यांनी संविधान दिवसाचे महत्त्व सांगितले. ईश्वर बाविस्कर, अजित अमोदकर, विकास सोनवणे, दीपक तायडे, हरीचंद सरोदे, गिरीश फालक, सचिन खाडवे, चंद्रकांत चौधरी, संदीप येवले, आदींची उपस्थिती होती.

यावल तालुका काँग्रेसतर्फे कार्यक्रम
यावल- शेतकी संघाचे शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्या अध्यक्ष खाली व माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शहरध्यक्ष कदीर भाई, शेतकी संघाचे संचालक अमोल बी.रोड, नगरसेवक मनोहर सोनवणे, असलम भाई, जाकिर भाई, अयुब भाई तसेच प्राचार्य व्ही.आर.पाटील व हाजी गफ्फार शहा, अनिल जमदाडे, अल्ताफ भाई तसेच सरपंच समाधान पाटील, सरपंच जलील पटेल, संदीप सोनवणे, राजू पिंजारी, प्रदीपसिंह पाटील, जयेश चोपड, काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अल्पसंख्यांक काँग्रेस सेलतर्फे अभिवादन
भुसावळ- जळगांव जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांकसेलतर्फे स्व.राजीव गांधी वाचनालयात संविधान दिवस व 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आमदार नीळकंठ फालक होते. काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष मुन्वर खान, अशफाक पटेल, महबूब खान, जिल्हाध्यक्ष जे.बी कोटेचा, शहराध्यक्ष सलीम गवळी, रघूनाथ गिरधर चौधरी, राजेंद्रे पटेल, तालुकाध्यक्ष अकील शाह, शैलेंद्र नन्वरे, जॉनी गवळी, हमीदा गवली, यासमीन बानों, सायरा बानो, आरीफ सैय्यद, फकरुद्दीन बोहरी, संजय खडसे, प्रदीप नेहेते, नौशान शाह उपस्थित होते.