भुसावळ विभागात भूकंपाचे सौम्य धक्के

0

नागरीक आले घराबाहेर ; सोशल मिडीयावर मेसेज व्हायरल

रावेर- भुसावळ विभागातील रावेरसह यावल व मुक्ताईनगर तालुक्यातील नदीकाठांवरील काही गावांमध्ये सोमवारी रात्री साडेसात ते पावणेआठ वाजेदरम्यान भूकंपाचे नागरीकांना सौम्य धक्के जाणवले तर अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरीकांमध्ये घबराट निर्माण होवून ते घराबाहेर आले. याबाबतचा मेसेज सोशल मिडीयावरही व्हायरल झाल्याने प्रत्येक जण नेमकी याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसून आला. भूकंपाची तीव्रता कळाली नसली तरी जिल्हा स्तरावरून प्रशासनाने माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. रावेर शहरातह अहिरवाडी, मोरगाव, निंभोरा, बोरखेडा, खानापूर, अटवाडे, रसलपूर या गावांसह अनेक गावांना सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रावेर शहरातील चौधरी नगर, सोनू पाटील नगर, नाला भाग, शिवाजी चौक भागाला देखील भूकंपाचे धक्के जाणवले. नागरीक भयभीत होवून घराबाहेर आले. दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यातील नदी काठांवरील अनेक गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याचे नागरीकांनी सांगितले.