भुसावळ विभागात मोफत वाय फाय सूविधा

0

भुसावळ :- विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांच्या सुविधेसाठी मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी दिली आहे.

पहिल्या टप्प्यात भुसावळ विभागातील भुसावळ मनमाड,अकोला,बडनेरा या रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.येत्या काही काळातच नाशिक,जळगाव रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा सुरू करण्यात येणार असून त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. तर उर्वरित अ श्रेणीच्या सर्व स्थानकांवर लवकरच ई सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले