भुसावळ विभागात सरकार स्थापनेचा जल्लोष

0

भुसावळसह वरणगाव व यावलमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी: एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा

भुसावळ महिनाभराच्या तिढ्यानंतर भाजपा सरकारने शनिवारी सरकार स्थापन केल्यानंतर भुसावळसह वरणगाव व यावलमध्ये भाजपा पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत एकमेकांना पेढे भरवत नृत्य करून आनंदोत्सव साजरा केला. भुसावळातील जामनेर रोडवरील आमदार संजय सावकारे यांच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला तर वरणगावातील राज्याचे संकटमोचक व माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक व नगराध्यक्ष सुनील काळे यांनी बसस्थानका फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. भुसावळातील जामनेर रोडवरील आमदारांच्या संपर्क कार्यालयाबाहेर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार संजय सावकारे यांनी आतषबाजी केली. याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे यांना आमदारांनी पेढा भरवला तसेच कार्यकर्त्यांनाही पेढे वाटप करण्यात आले.

बोदवडमध्ये फटाक्यांची आतषबाजी :

बोदवड। शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतबाजी करून जल्लोष करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामदास पाटील, शांताराम चौधरी, भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते अनंत कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते रवी बावस्कर, संचालक जिल्हा दुध संघ मधुकर राणे, नगरसेवक कैलास चौधरी, उपनगराध्यक्ष दिनेश माळी, नगरसेवक अनिल खंडेलवाल, विजय चौधरी, भाजपा कार्यकर्ते आनंद माळी, विजेंद्र पाटील, सचिन राजपुत, नरेश आहुजा, राम आहुजा, उज्वल खाचणे, भरत आप्पा पाटील, जीवन राणे, दिलीप घुले, कालू गायकवाड, निलेश पाटील, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

वरणगावात पदाधिकार्‍यांचा जल्लोष

वरणगावातील पदाधिकार्‍यांनी संकटंमोचक गिरीशभाऊ महाजन यांच्या गाण्यावर जल्लोष केला. बसस्थानक चौकात नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या उपस्थितीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ‘सर्वांच्या सुख-दुख:त एक आहे कोण आपले गिरीशभाऊ’ या गाण्यावर कार्यकर्ते थिरकले. प्रसंगी उपनगराध्यक्ष शेख अखलाख, नगरसेविका नसरीन बी.साजीद कुरेशी, कामगार नेते मिलिंद मेढे, इरफानभाई पिंजारी, साजीद भाई कुरेशी, भाजपाचे ज्येष्ठ नेते हाजी अल्लाउद्दीन सेठ, युवा नेते अजय पाटील, संजयकुमार जैन, शामराव धनगर, ज्ञानेश्वर घाटोळे, माजी सरपंच सुखलाल धनगर, सगीर अण्णा, सुनील माळी, नटराज चौधरी, प्रकाश चौधरी, डॉ.बी.व्ही.जंगले, राजेंद्र गुरचळ, माजी सभापती नामदेव पहेलवान, रमेश पालवे, रामदास पहेलवान, किरण धुंदे, कुंदन माळी, शंकर पवार, आकाश निमकर, तेजस जैन, लखन माळी, हितेश चौधरी, नरेंद्र बावणे, डी.के.खाटीक, धीरज माळी, चेतन माळी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


यावलला फटाक्यांची आतषबाजी

यावल। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा दिल्याने पुन्हा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर यावल येथील पंचायत समिती कार्यालयाबाहेर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. प्रसंगी माजी आमदार हरीभाऊ जावळे, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील, नगरसेवक कुंदन फेगडे, शहराध्यक्ष हेमराज फेगडे उर्फ बाळु फेगडे यांनी फटाके फोडून आतषबाजी केली. याप्रसंगी कार्यकर्त्यांनाही पेढे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार हरीभाऊ जावळे, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य हर्षल पाटील, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे , शहराध्यक्ष हेमराज फेगडे, हिराभाऊ पाटील, गोपालसिंग पाटील, उमेश फेगडे , विष्णू पारधे, व्यंकट बारी, भूषण फेगडे, स्नेहल फिरके, आकाश कोळी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रावेरात पेढ्यांचे वाटप:

रावेर। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर रावेरात फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष व नियोजन समिती सदस्य पद्माकर महाजन यांच्या कार्यालयाजवळ फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजपा सरचिटणीस वासुदेव नरवाडे, सरचिटणीस रवींद्र पाटील, माजी शहराध्यक्ष उमेश महाजन, तालुका सदस्य दिलीप पाटील, तालुका सदस्य भूषण महाजन, युवा मोर्चा शहराध्यक्ष लखन महाजन, व्यापारी आघाडी अध्यक्ष पप्पू शेठ गिनोत्रा, भगवान चौधरी, रवींद्र महाजन, ईश्वर महाजन, राकेश पांडे, अमोल चितोडकर, दिवाकर प्रजापती, गणेश मराठे व मोठ्या संखेने भाजपाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती

प्रसंगी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, नगरसेवक युवराज लोणारी, किरण कोलते, राजेंद्र नाटकर, राजेंद्र आवटे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील, सतीश सपकाळे, गिरीश महाजन, परीक्षीत बर्‍हाटे, दिनेश नेमाडे, किरण चोपडे, रमाशंकर दुबे, देवा वाणी, दीपक धांडे, नंदकिशोर बडगुजर, प्रा.प्रशांत पाटील, पवन बुंदेले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.