भुसावळ विभागात सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

0

लोहपुरूषांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी निघाल्या शोभायात्रा ; विविध कार्यक्रमांचे आयोजन

भुसावळ- भुसावळ विभागात माजी उपपंतप्रधान लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त तर माजी प्रथम महिला पंतप्रधान इंदीरा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. ठिकठिकाणी लोहपुरूषांच्या जयंतीनिमित्त शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात आली तसेच रन फॉर युनिटी हा उपक्रमही राबवण्यात आला. मान्यवरांच्या मनोगतात थोरपुरूषांच्या कार्याचा आढावा मांडला.

ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात कार्यक्रम
मुक्ताईनगर- ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात माजी प्रथम महिला पंतप्रधान इंदीरा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त तसेच माजी उपपंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. एस.ए.भोई, शरद महाजन, लिला पवार, शे. भैया, सलिम मंत्री, डी.आर.महाजन, हेमराज महाजन, संजू महाजन, अनिल वाडीले, बी.डी.पाटील, चौधरी, मधुकर वानखेडे आदींची उपस्थिती होती.

ज्ञानपूर्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेज
इच्छापूर- ज्ञानपूर्णा विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्व.इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य एन.आय.पाटील हे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये पर्यवेक्षक सी.बी.मोरस्कर, मुरलीधर पाटील, रवींद्र कांडेलकर, भानुदास मुळक, सुरेश राणे, विद्या मंडपे, आशा कांडेलकर, सुधीर मेढे, विनायक वाडेकर, मनोज भोई ,भगवान महाजन, महेंद्र तायडे, विजय दत्त भवराय, प्रदीप पाटील, मीनल कोल्हे, गणेश पवार, बाळासाहेब देशमुख, विश्वासराव देशमुख, मंजुळाबाई पाटील, गोपाळ सपकाळ, बेबाबाई धाडे तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटी
मुक्ताईनगर- मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमेटीतर्फे झालेल्या कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, जिल्हा सचिव आसीफखान ईस्माईल खान, बी.डी.गवई, अ‍ॅड.अरविंद गोसावी, पवन खुरपडे, अतुल जावरे, अनिल सोनवणे, रीझवान खान, पवन कांडेलकर, संजय धमोळे, विलास कपले, शिवा कोळी, दीपक चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

रावेरला प्रतिमा मिरवणुकीने वेधले लक्ष
रावेर- तालुक्यातील गुर्जर समाजातर्फे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त सरदार पटेल यांच्या प्रतिमेची रथातून मिरवणूक काढण्यात आली. हजारो युवा कार्यकर्त्यांनी भगवे व लाल फेटे बांधून नागरीकांचे लक्ष वेधले. शहरातील प्रमुख मार्गावरुन ही मिरवणूक निघाली. माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, उपनगराध्यक्ष अ‍ॅड.सुरज चौधरी, जिल्हा परीषद सदस्य नंदा अमोल पाटील, नगरसेवक सुधीर पाटील, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, शीतल पाटील, माजी सरपंच विशाल पाटील, सरपंच राहुल पाटील, विटवे सरपंच भास्कर चौधरी, तांदलवाडी सरपंच श्रीकांत महाजन, समृध्दी हॉस्पीटलचे डॉ.प्रवीण चौधरी, पंचायत समितीचे माजी सदस्य महेश पाटील, अनिल पाटील, भागवत पाटिल, सुनील पाटील, नितीन महाजन, वासुदेव नरवाडे यांच्यासह युवा कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.

शासकीय कार्यालयात जयंती उत्साहात
सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त रावेर शहरातील तहसील कार्यालय, महावितरण, जिल्हा परीषद बांधकाम, नगरपालिका, जलसंधारण, वनविभाग, पोलिस स्टेशन, बाजार समिती, सार्वजनिक बांधकाम, पंचायत समिती, आदी ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली.

सावद्यात रन फॉर युनिटी
सावदा- लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 143 व्या जयंतीनिमित्त आ.गं.हायस्कूल आणि ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले. सी.सी.सपकाळे यांनी झेंडा दाखवून उद्घाटन केले. आयोजन संजय महाजन यांनी केले. राष्ट्रीय एकात्मतेची शपथ नंदू पाटील यांनी मुलांना दिली. मुख्याध्यापक सी.सी.सकाळे यांनी प्रतिमेचे पूजन केले. सूत्रसंचालन नंदू पाटील यांनी केले.

मध्य रेल्वेत जयंती उत्साहात
भुसावळ- डीआरएम कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त मंडळ रेल्वे प्रबंधक आर.के.यादव यांच्या उपस्थितीत रन फॉर युनिटीला सुरुवात झाली. डीआरएम कार्यालय, गांधी पुतळा, पंचमुखी हनुमान, जुना सातार्‍यात रॅलीचा समारोप झाला. प्रसंगी सरदार वल्लभभाई यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. अपर मंडळ रेल प्रबंधक मनोज सिन्हा, मुख्य वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, मुख्य यांत्रिक अभियंता रामचंद्रन, मुख्य कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे तसेच सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, रेल्वे स्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षक व स्काऊटचे विद्यार्थी उपस्थित होते.

पु.ओ.नाहाटा महाविद्यालय, भुसावळ
भुसावळ- पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकता दिन म्हणून साजरी झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एम.व्ही.वायकोळे, उपप्राचार्य बी.एच.बर्‍हाटे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.एस.के.राठोड, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.एस.नाडेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रतीक्षा सोळुंके यांनी तर आभार ममता पाटीलने मानले.