भुसावळ विभागात स्व.बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

0

मुक्ताईनगरात युवा सेना सदस्य नोंदणी ; यावलसह वरणगावला प्रतिमा पूजन

भुसावळ- भुसावळ विभागात हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुक्ताईनगरात युवा सेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ झाला तर वरणगावसह यावलला प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मुक्ताईनगरात सदस्य नोंदणी
मुक्ताईनगर- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात स्व.बाळासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पन व पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी युवा सेना सदस्य नोंदणी अभियानाचा देखील शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
अ‍ॅड.मनोहर खैरनार, तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, गोपाळ सोनवणे, तालुका संघटक प्रवीण चौधरी, शहर संघटक वसंत भलभले, शहरप्रमुख गणेश टोंगे, नगरपंचायत गटनेते राजेंद्र हिवराळे, नगरसेविका सविता भलभले, नगरसेवक संतोष मराठे, हारून शेख, माजी उपसरपंच जाफरअली नजीर अली यांच्यासह महिला आघाडीच्या जिल्हा संघटक कल्पना पालवे, उपजिल्हा संघटक सुषमा बोदडे-शिरसाठ, तालुका संघटक शोभा कोळी, उपतालुका संघटक उज्वला सोनवणे, शहर संघटक सरीता कोळी, उपशहर संघटक सुनीता तळेले, ह.भ.प कीर्तनकार दुर्गा मराठे, सचिन पाटील, पप्पू मराठे, मजीद खान, विकास राजपूत, रोहिदास शिरसाठ, किरण कोळी, समाधान गवते, स्वप्निल श्रीखंडे, संदीप पाटील, अर्जुन भोई, दीपक पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. युवासेनेचे पवन सोनवणे, पंकज राणे, दीपक खुळे, सुमेरसिंग राजपूत, आकाश सापधरे, निलेश डवले, गौरव तळेले, अनिकेत भोई आदींनी युवा सेनेची सदस्य नोंदणी अभियानास यशस्वीपणे राबविली.

वरणगाव शहरात जयंती उत्साहात
वरणगाव- हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमत्त बसस्थानक चौकात प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी विलास मुळे, नितीन देशमुख, रवींद्र सुतार, चंद्रकांत शर्मा, सुनील भोई, डिगंबर चौधरी, सुभाष चौधरी, तुषार चौधरी, सुकदेव धनगर, गोविंदा चौधरी, पवन माळी, अमर सोनार, योगीता सोनार, ज्योती अग्रवाल, यशवंत बढे, सुभाष झोपे, संजय वंजारी, निलेश काळे, अतुल शेठे, आबा पाटील, आबा सोनार आदी शिवसैनिक उपस्थित होते.

यावल शहरात विविध कार्यक्रम
यावल- जयंतीचे औचित्य साधून यावल शहरात शिवसेना व युवासेना यांच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावल शहरातील बाल संस्कार शाळा, लिटील, तारेकश्वर शाळा, यावल प्राथमिक शाळा, सर सैयद अहमद खान उर्दु प्रायमरी स्कूल, निव बच्चपन स्कूल, ग्लोबल स्कुल, स्वामी विवेकानंद शाळा, जि.प.उर्दू शाळा आदी शाळांमील चिमुकल्यांना मुलांना खाऊ वाटप करण्यात आा. यावल शिवसेना कार्यालयावर व स्व.बाळासाहेब ठाकरे टी पॉईटवरील शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.. शहरातील श्री रेणुका देवी मंदिरात शिवसेना महिला आघाडीच्यातर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्यात आला. सायंकाळी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

यांची होती उपस्थिती
शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुन्ना पाटील, उपजिल्हा संघटक (नगरसेवक), दीपक बेहेडे, शिक्षक सेना जिल्हा संपर्क प्रमुख भुषण नागरे, नगराध्यक्ष सुरेखा कोळी, तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, शिवसेना आदिवासी सेल तालुकाप्रमुख हुसेन तडवी, अल्पसंख्यांक तालुका संघटक अजहर खाटीक, युवासेना शहर अधिकारी सागर देवांग, शिवसेना उप तालुका संघटक सुनील (पप्पू) जोशी, जितेंद्र सरोदे, शिक्षक सेना तालुका सरचिटणीस रोहित भालेराव, शिवसेना उपशहरप्रमुख संतोष धोबी, उपशहरप्रमुख जितेंद्र फालक, उपशहरप्रमुख मोहसीन खान, उपशहरप्रमुख किरण बारी, युवासेना उपशहर अधिकारी सागर बोरसे, शिवसेना शहर संघटक सुनील बारी, महिला आघाडी शहर संघटक सपना घाडगे, युवा सेना उपशहर अधिकारी पिंटु कुंभार आदींची उपस्थिती होती.