भुसावळ विभागाला दुसर्‍या दिवशीही संपाचा फटका

0

तहसीलमध्ये शुकशुकाट, शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान : जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

भुसावळ- विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मंगळवारपासून तीन दिवसीय संपावर उतरले आहेत. संपाचा बुधवारी दुसरा दिवस असल्याने भुसावळ विभागातील सरकारी कार्यालयांसह शाळांमध्ये सर्वत्र शुकशुकाट जाणवला. सरकारी कार्यालयातीत शुकशुकाट असल्याने विविध कामांसाठी आलेल्या नागरीकांची चांगलीच गैरसोय झाली.

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
भुसावळ- सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी सह विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या संपात खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वात जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळा मोठ्या संख्येने संपात सहभागी झाल्या आहेत. संपाच्या दुसर्‍या दिवशी भुसावळ तालुक्यातील सर्व खाजगी प्राथमिक शाळा बंद राहिल्या. तालुक्यातील 23 खाजगी प्राथमिक शाळेतील 228 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. तालुक्यातील खाजगी प्राथमिक शाळांनी संपात सहभाग घेत शंभर टक्के संप यशस्वी केल्याची माहिती खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ भुसावळ तालुका संघटनेच्यावतीने देण्यात आली. बुधवारी जिल्हास्तरीय बैठक घेऊन संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी संपात सहभागी कर्मचार्‍यांना संघटनेचे महत्त्व पटवून देत ज्या शाळा संपात सहभागी झाल्या नाहीत त्यांची नावे सुद्धा कळविण्याच्या सूचना तालुकाध्यक्षांना दिल्या. त्यानंतर शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बोदवडला एन मुक्टोचा संपाला पाठिंबा
बोदवड- महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने पुकारलेल्या आंदोलनाला नुसार एन. मुक्टो.बोदवड कॉलेजच्या स्थानिक शाखेने पाठिंबा दर्शवला. 6 रोजी सकाळी 11 वाजता काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शाखेचे अध्यक्ष प्रा.डॉ.प्रभाकर महाले, सचिव प्रा.एच. एम.कोटेचा, प्रा.एम.एस.निकाळजे, प्रा.डॉ.मधु खराटे, प्रा.डी.एस.पाटील, डॉ.पी.एन.पाटील ,प्रा.डॉ.ए.आर.बारी आदी प्राध्यापक उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद चौधरी यांना निवेदन देण्यात आले.

मुक्ताईनगरात शिक्षक संघटनांचे तहसील समोर निदर्शने

मुक्ताईनगर- महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) ने शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या 7 ते 9 ऑगस्टच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी मुक्ताईनगर तालुका टीडीएफ, मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षकेतर कर्मचारी संघ आदी संघटनांनी मुक्ताईनगर तहसील कार्यालयास समोर बुधवारी निदर्शने केली. संपाच्या दुसर्‍या दिवशी नायब तहसीलदार निलेश पाटील, बीडीओ डी.आर.लोखंडे,तालुका गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे आदींना संपात सहभागी असल्याचे निवेदन दिले.

यांची होती उपस्थिती
मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष एन.आयपाटील, एस.एम.उज्जैनकर , एस.डी.सांगलकर, पी.पी.दाणे, आर.पी.पाटील, एन.एच.पॉपे, ए.के.सूर्यवंशी, एस.बी.सोनवणे, बी.आर.पाटील, पी.डी.महाजन, डी.ई.पाटील, शेख ईकबाल, शेख शकील, सी.बी.मोरस्कार, गजानन भारुडकर, शरद बोडदे, सी.डी.इंगळे, एस.आर.मोरेस्कर, पी.बी.चौधरी, एम.जी.कोल्हे, सी.डी.भोई, व्ही.डी.तायडे, एस.डी.पाटील, विनायक वाडेकर, एस.डी.कुरकुरे , एन.पी.भोम्बे, एस.एस.नांनगे, दिलीप पाटील , एस.पी.राठोड, चिखलकार, एन.जे.कोलते, आर.के.ढोले, गणेश निंभोरे, के.आर.कावळे, एम.पी.संग्रामपूरकार, बी..एस.बिरलिंगे आदी शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, महसूल प्रशासनाचे लिपिक तलाठी तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले तर ग्रामसेवक संघटनांनीदेखील याप्रसंगी पाठिंबा दिला.