भुसावळ व यावल तहसीलदारांचा जिल्हाधिकारी करणार गौरव

0

भुसावळ। महसुल उद्दीष्टाची वसुली, सातबारा संगणकीकरण, अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा व उत्कृष्ट प्रशासकीय कामकाजाची दखल जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी घेतली असून भुसावळचे प्रभारी तहसीलदार संजय तायडे व यावलचे तहसीलदार कुंदन हिरे यांचा गौरव सोमवार, 14 रोजी जळगाव येथे करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दुपारी दोन वाजता हा सोहळा होणार आहे.