भुसावळ : सामाजिक शांततेला धोका ठरू पाहणार्या 18 उपद्रवींना गणेशोत्सव काळात शहर व तालुक्यात बंदी करण्यात आली होती मात्र आदेश डावलून शहरात वास्तव्य करणार्या जितू शरद भालेराव (25, टेक्नीकल हायस्कूलमागे, भुसावळ) यास शहर पोलिसांच्या पथकाने सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. संशयीताविरोधात भादंवि 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहर निरीक्षक प्रताप इगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे एएसआय संजय कंखरे, हवालदार सुपडा पाटील, नाईक विकास बाविस्कर, नाईक पराग सोनवणे व होमगार्ड पथकाने केली. तपास एएसआय संजय कंखरे करीत आहेत.