भुसावळ शहरातील गुन्हेगार एक वर्षांसाठी हद्दपार
शहरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ : आगामी काळात अनेकांची होणार हद्दपारी
भुसावळ : शहरातील सात संशयीतांना अलिकडेच हद्दपार करण्यात आल्यानंतर पुन्हा सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्या उपद्रवीला एक वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी हद्दपार केले आहे. जितेंद्र उर्फ जितू किसन गोडाले (वाल्मीक नगर, 72 खोली, जामनेर रोड, भुसावळ) असे हद्दपार करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे.
निवडणूक पार्श्वभूमीवर आणखी काहींची होणार हद्दपारी
भुसावळ पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून हद्दपारीचे सुमारे 38 प्रस्ताव प्रस्ताव तयार करून ते प्रांत कार्यालयात सादर करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात एकूण आठ उपद्रवींवर हद्दपारीची कारवाई झाल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, जितेंद्र उर्फ जितू गोडाले याच्याविरोधात लोहमार्ग, सावदा, जामनेर व बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तत्कालीन बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांनी गोडालेविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला. त्यावर सुनावली होवून एक वर्षासाठी संशयीताला जिल्ह्यातून एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आल्याचे पोलिस उपअधीक्षक डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे म्हणाले.