भुसावळ : शहरातील टिंबर मार्केट ते आराधना कॉलनीला जोडणार्या रेल्वे लाइनखालील बोगद्याचे काम पूर्णत्वास असले तरी अॅप्रोच रोडचे काम रेंगाळले आहे. परीणाम भुसावळ शहरातील 20 हजार रहिवाशांना शहरात फेर्याने ये-जा करावे लागत आहे. नागरीकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी नुकतीच मध्य रेल्वेचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्याशी चर्चा केली. लॉकडाऊनमुळे मजूर गावी गेले असून लवकरच ते परतल्यानंतर कामास सुरूवात होवून ते लवकरच पूर्ण केले जाईल, असे आश्वासन डीआरएम गुप्ता यांनी आमदारांना दिले.