भुसावळ : शहरातील रामदेव बाबा नगरातील रोहित दिलीप कोपरेकर (21) या तरुणाच्या खून प्रकरणी संशयीत आरोपी सागर दगडू पाटील (22, भुसावळ) यास कल्याण क्राईम ब्राँचने अटक केल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले व मंगळवारी रात्री उशिरा आरोपीला अटक करण्यात आली.
एक संशयीत अद्याप पसार
खून प्रकरणातील दुसरा मुख्य संशयीत पसार असून त्याच्या अटकेनंतर खुनाच्या नेमक्या कारणांचा उलगडा होणार आहे. दरम्यान, सोमवारी बाजारपेठ पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रत मिळाल्यानंतर रात्री उशिरा मयताची आई संगीता दिलीप कोपरेकर (45, रामदेवबाबा नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड करीत आहेत.