भुसावळ शहरातील तरुणाच्या मृत्यू प्रकरणी चारचाकी चालकाविरोधात गुन्हा

Accidental death of youth in Bhusawal : Crime against four wheeler driver भुसावळ : शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर बंद असलेल्या फेकरी टोल नाक्यानजीक वरणगावकडून भुसावळकडे घरी येत असलेल्या यश विनोद वाणी (20, विठ्ठल मंदिर वॉर्ड, भुसावळ) या युवकाच्या दुचाकीला समोरून येणार्‍या भरधाव चारचाकीने उडवल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी शहरातील चारचाकी चालक धनंजय संजय पाटील विरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चारचाकीच्या धडकेने झाला होता मृत्यू
जळगावातील महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा यश वाणी हा तरुण मित्र सागर संजय शिंदे (विठ्ठल मंदिर वॉर्ड, भुसावळ) सोबत दुचाकीने वरणगावकडून भुसावळकडे येत असताना वरणगावकडे सुसाट वेगाने निघालेली महिंद्रा टीयुव्ही (एम.एच.19 सी.यु.9694) वरील चालक धनंजय पाटील याने जोरदार धडक दिल्याने यश वाणी याचा जागीच मृत्यू झाला तर सागर शिंदे जखमी झाला होता. या प्रकरणी सागरच्या फिर्यादीवरून चालक धनंजय पाटील विरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय श्यामकुमार मोरे करीत आहेत.