भुसावळ । गावठी कट्टा बाळगून असलेल्या दोघांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने भुसावळातून आवळत बनावट बंदूकही जप्त केली. सागर उर्फ डिगंबर रेवाराम कहार (18) व कुणाल गोपाळ करोसीया (20, दोन्ही रा. चांदमारी चाळी, सात नंबर पोलीस चौकी मागे, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दहा हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा तर पाच हजार रुपये किंमतीची बनावट बंदूक जप्त करण्यात आली.
गुप्त माहितीवरुन कारवाई
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे सोमवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. आरोपींविरुद्ध शहर पोलिसात मध्यरात्री रवींद्र भगवान पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंपी, रवींद्र पाटील, शशीकांत पाटील, संजय पाटील, युनूस शेख, दीपक पाटील, प्रवीण हिवराळे आदींचा समावेश होता.