भुसावळ शहरातील बसस्थानक परीसरात अनोळखी इसमाचा मृत्यू

Death of unknown Isma in Bhusawal City भुसावळ : शहरातील बसस्थानक परीसरातील पास विभागाच्या जवळील शेडमध्ये सार्वजनिक जागी शनिवार, 12 रोजी सकाळी 10 वाजेपुर्वी 30 ते 35 वयोगटातील एक अनोळखी इसम आढळून आला. याबाबत वाहतुक नियंत्रण बाळकृष्ण वामन पवार यांनी दिलेल्या खबरीवरून बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास नाईक उमाकांत पाटील करीत आहेत.